अकोला

१ . अकोला जिल्हा - स्थान व सीमा 

स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात अकोला जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पूर्व  भागात आहे.

सीमा : अकोला जिल्हाच्या उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा आहे. दक्षिणेस वाशिम जिल्हा व पश्चिमेस बुलढाणा  आहे.


महाराष्ट्र राज्य - 
अकोला जिल्हा

  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण  अकोला
  • क्षेत्रफळ – 5,429 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 18,18,617 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – (  ) – अकोट, बाळापूर, तेल्हारा, अकोला, मूर्तीजापूर, पातुर, बार्शी टाकळी.

२. भूरूपे 

               अकोला जिल्ह्यात विविध भूरूपे आहेत. पूर्ण नदीच्या खोऱ्यात बहुतेक भाग सपाट मैदान आहे. जिल्ह्यात उत्तर भागात गाविलगडचे डोंगर आहेत. तर दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. जिल्ह्यात उत्तरेस नरनाळा किल्ला आहे.
               भूरूपांच्या उंचसखलपणामुळे प्राकृतिक रचना समजते. अकोला जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार तीन विभाग पडतात.

              प्राकृतिक विभाग 

( १ ) गाविलगडचा डोंगराळ  प्रदेश  :
                                                        या विभागात जिल्ह्यातील तेल्हारा व अकोट तालुक्यांचा उत्तर भाग येतो.

( २ ) अजिंठ्याचा डोंगराळ व पठारी प्रदेश   :
                                                                     जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. हा भाग बराचसा पठारी आहे. यात  पातूर व बार्शीटाकळी तालुक्यांचा भाग येतो.

( ३ ) पूर्ण  नदीचा   प्रदेश  : 
                                        या प्रदेशात जिह्याचा  मध्यभाग येतो.  यात अकोट तेल्हारा तालुक्यांचा दक्षिण भाग यांचा समावेश होतो. बार्शीटाकळी  तालुक्याचा उत्तर भाग यात येतो.


हवामान 

    अकोला जिल्हाचे हवामान साधारणपणे उष्ण व कोरडे आहे. उनल्हा फार कडाक असतो. मे महिन्यात तापमान बरेच वाढते. हिवाळ्यात तापमान कमी असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमी त कमी असते.
      उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्यातील बाळापूर, अकोला, मूर्तिजापूर तालुक्यात पाऊस कमी पडतो.



अकोला जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • अकोला – मोरणा नदीमुळे या शहराचे जुने व नवे असे दोन भाग पडलेले आहे. पंजाबराव कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण, सतीमाता मंदीर व जैन मंदीर व जैन मंदीर प्रसिद्ध आहे.

  • बाळापूर – बालापूरचा किल्ला 1757 मध्ये इस्माईल खानाने पूर्ण केला या किल्ल्याच्या खाली बळादेवीचे मंदीर आहे.

  • नरनाळा – येथील 22 दरवाज्यांचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. 1509 मध्ये महाबत खानाने बाधलेली मस्जिद आहे.

  • मूर्तीजापूर – येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.

  • पातुर – हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिद्ध आहे.

  • पारस – औष्णिक वीज निर्मिती केंद्र.

  • अकोट – सतरंज्या व गोणी प्रसिद्ध.

  • आडगाव – ता. अकोट, मुगल काळातील परगण्याचे हे केंद्र. याच गावात 1671 साली व्दारकेश्वराचे मंदीर बाधण्यात आले. गावाजवळच इंग्रज अधिकारी मेजर बुलक याचे थडगे आहे.

  • हिवरखेड – आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.








No comments:

Post a Comment