नागपूर

   १ . नागपूर जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात नागपूर जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पूर्व भागात आहे.

सीमा : नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेशातील छिदवाडा व शिवणी हे जिल्हे असून वायव्येस अमरावती जिल्हा आहे. दक्षिणेस चंद्रपुर जिल्हा, पूर्वेस भंडारा जिल्हा आणि पश्चिमेस वर्धा जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - 
नागपूर जिल्हा


  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – नागपूर 
  • क्षेत्रफळ – 9,892 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 46,53,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – (१) – काटोल, सावणेर, रामटेक, हिंगणा, नागपूर (ग्रामीण), नागपूर (शहर), उमरेड, कामठी, नरखेड, कळमेश्वर, मौदा, भिवापुर, कुही, पारशीवणी.
    नागपूर जिल्हा - तालुके 


नागपूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • नागपूर – महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. येथील सीताबर्डीचा किल्ला पाहण्यासारखा आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ, निरी; रमन विज्ञान केंद्र प्रसिध्द आहे.

  • कामठी – दगडी कोळश्याच्या खाणीसाठी प्रसिध्द आहे. येथे सैनिकी शिक्षण देणारे विद्यालय असून अलीकडे येथील ड्रॅगण पॅलेस टेम्पल प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित होत आहे.

  • काटोल – येथे लिंबू या फळाचे संशोधन केंद्र आहे.

  • सावनेर – दगडी कोळश्याच्या खाणी आहेत.

  • रामटेक – येथेच महाकवी कालिदासांनी मेघदूत हे काव्य लिहिले होते. येथे महाकवी कालिदास स्मारक आहे.

  • अंभोरा – येथील चैतन्येश्वराचे व हरिहर स्वामींचे मंदिर प्रसिध्द आहे.

  • कळमेश्वर – संत्रा व मिरचीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे.

  • भिवापुर – मिरचीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे.

No comments:

Post a Comment