यवतमाळ

 १ . यवतमाळ जिल्हा  - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात यवतमाळ जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पूर्व भागात आहे.

सीमा : उत्तरेस वर्धा व अमरावती जिल्हा, दक्षिणेस नांदेड जिल्हा व आंध्र प्रदेश आहे. पूर्वेस चंद्रपूर जिल्हा आणि पश्चिमेस परभणी व अकोला जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - 
यवतमाळ जिल्हा


  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण  यवतमाळ
  • क्षेत्रफळ  13,582 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 27,75,457 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – ( १६ )– दारव्हा, यवतमाळ, पुसद, राळेगांव, वणी, बाभुळगांव, कळंब, मारेगांव, पांढरकवडा, घाटंजी, दिग्रस, नेर, उमरखेड, महागांव, आर्णी, झरिजामाणी.
        
    यवतमाळ जिल्हा - तालुके 

       
यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • यवतमाळ – प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था येथे आहे. येथील केदारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.

  • वणी – येथील रंगनाथस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे.

  • पाटणबोरी – हे ठिकाण पांढरकवडा तालुक्यात असून दगडापासून फरशी बनविण्याचा उधोग येथे आहे.
  • घाटंजी – मोरोली महाराजांच्या यात्रेकरिता प्रसिद्ध.

  • कळंब – कलंबचा श्री चिंतामणी विदर्भातील भाविकांचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. भारतातील 21 महत्वाच्या आणि पौराणिक आधार असलेल्या गणेश स्थानांमध्ये श्री चिंतामणीचा समावेश होतो.

No comments:

Post a Comment