भंडारा

 १ . भंडारा जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात भंडारा जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पूर्व भागात आहे.

सीमा : भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेश असून पूर्वेस गोंदिया जिल्हा आहे. दक्षिणेस चंद्रपुर जिल्हा आणि पश्चिमेस नागपुर जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - 
भंडारा जिल्हा


  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – भंडारा
  • क्षेत्रफळ – 3,896 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 11,98,810 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – (७) – भंडारा, साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर, लाखांदूर, लाखणी.

भंडारा
 जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • भंडारा – गवळी राजवटीत बाधलेला प्राचीन किल्ला शहरात आहे. पितळी भांडी प्रसिद्ध आहेत. येथे अलोनीबाबा या संताचा मठ आहे. भंडार्‍याचे निलभट्ट यांच्या घरी चक्रधर स्वामींनी मुक्काम केले आहे.

  • तुमसर – तांदळची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. येथे मँगनीज शुध्द करण्याचा कारखाना आहे.

  • भंडारा रोड – येथे मोठा पोलाद प्रकल्प आहे.

  • जवाहरनगर – युध्द साहित्य निर्मितीचा मोठा कारखाना आहे.

  • अंबागड – येथील मध्ययुगीन किल्ला प्रसिध्द असून तो बख्त बुलंदशाह या गोंड राजाने बांधला आहे.

  • पवनी – हे स्थळ प्राचीन काळी बौध्द धर्मियांचे महत्वाचे क्षेत्र होते. येथे बौध्द कालीन स्तूप आहे.

  • अड्याळ – येथील हनुमान मंदिर प्रसिध्द आहे.

No comments:

Post a Comment