सोलापूर

१ . सोलापूर जिल्हा  - स्थान व सीमा 

स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात सोलापूर जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहे.

सीमा : सोलापूर जिल्हाच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हा, पूर्वेस उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस सातारा जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य असून वायव्येस पुणे जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - 
सोलापूर जिल्हा


  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – सोलापूर     
  • क्षेत्रफळ – 14,895 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 43,15,527 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके  ( 11 ) – करमाळे, बार्शी, माढे, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, मंगळवेढे, अक्कलकोट.

    सोलापूर जिल्हा - तालुके 


सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • सोलापूर – येथील चादरी ‘सोलापुरी चादर’ या नावाने विशेष प्रसिद्ध आहेत.

  • पंढरपूर – पंढरपूर हे देशातील प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी एक आहे. येथे महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुखमिणीचे मंदीर असून आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक दर्शनाला येतात.

  • अक्कलकोट – स्वामी समर्थ यांचे मोठे मंदीर.

  • करमाळे – येथील भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर प्रसिद्ध आहे.

  • बेगमपुर – ता. मोहळ – येथे औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे.

  • ब्र्म्ह्पुरी – हे गाव मंगळवेढा या तालुक्यात येत असून येथे यादवकालीन सिद्धेश्वर मंदीर आहे.

  • नान्नज – सोलापूरपासून 20 किमी. अंतरावर नान्नज हे ठिकाण वसले आहे. हरिणे व आकर्षक व दुर्मिळ अशा ‘माळढोक’ या पक्षांसाठी नान्नज येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे.


No comments:

Post a Comment