लातूर

   १ .लातूर जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात लातूर जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात भागात आहे.

सीमा : लातूर जिल्हाच्या उत्तरेस परभणी आणि पूर्वेस परभणी जिल्हा असून पूर्वेस व उत्तरेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस व पश्चिमेस उस्मानाबाद जिल्हा, वायव्येस बीड जिल्हा असून आग्नेयेस कर्नाटक राज्यातील बीदर जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - लातूर जिल्हा 


  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – लातूर

  • क्षेत्रफळ – 7,157 चौ.कि.मी.

  • लोकसंख्या – 24,55,543 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

  • तालुके – 10 – लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, चाकूर, देवणी, शिरूर-अनंदपाळ, जळकोट, रेणापुर.


लातूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • लातूर – हे शहर मराठवाड्यातील ‘विधेचे माहेरघर’ गणले जाते. येथील सुरताशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर व पार्श्वनाथ मंदिर प्रसिद्ध आहेत.

  • उद्गीर – उदगीरचा यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.

  • ओस – औरंगजेबाने बाधलेली मास्जिद प्रसिद्ध आहे.
  • खरोसा – हे गाव हिंदू व बौद्ध लेण्यासाठी प्रसिद्ध आहे.

  • रेणापुर – येथील रेणुकादेवीचे मंदिर व हलती दीपमाळ प्रसिद्ध आहे.

  • वडवळ – अहमदपूर तालुक्यातील या गावालगत औषधी वनस्पती असलेली टेकडी आहे.

  • निलंगा – नीलकंठश्वरचे प्रसिद्ध मंदिर व दूधभुकटीचा कारखाना.

  • हत्ती बेट – हतीच्या आकाराचा हा डोंगर ‘हत्ती बेट’ म्हणून प्रसिद्ध आहे. डोंगरावर हत्तीच्या आकाराचे भरपूर दगड, प.पू. गंगाराम महाराजांचे समाधीस्थान आहे.

No comments:

Post a Comment