१ . कोल्हापूर जिल्हा - स्थान व सीमा
स्थान : महाराष्ट्र राज्याच्या नकाशात कोल्हापूर जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात दक्षिण भागात आहे.सीमा : कोल्हापूर जिल्हाच्या पश्चिमेस रत्नागिरी व सिंधदुर्ग हे जिल्हे आहेत. उत्तरेस सांगली जिल्हा आहे तर पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे.
|
महाराष्ट्र राज्य - कोल्हापूर जिल्हा |
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – कोल्हापूर - क्षेत्रफळ – 7,685 चौ. कि.मी.
- लोकसंख्या – 38,77,015 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 12 – शहुवाडी, हातकणगले, पन्हाळा, शिरोळ, करवीर, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल, भुदगड (गारगोटी), राधानगरी.
- महानगरपालिका - 1
|
कोल्हापूर जिल्हा - तालुके |
|
|
२. भूरूपे
कोल्हापूर जिल्ह्यात विविध भूरूपे आहेत. जिल्ह्यातील नद्यांच्या काठा चा भाग मैदानाचा आहे.
जिल्ह्याच्या मध्य व दक्षिण भागांत टेकड्या आहेत. पन्हाळा, उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा, चिकोडी या जिल्ह्यातील प्रमुख डोंगररांगा आहेत. या डोंगररांगा म्हणजे सह्याद्री पर्वताचे फाटे आहेत. पश्चिम भागात सह्याद्री पर्वत आहे.
भूरूपांच्या उंचसखलपणामुळे प्राकृतिक रचना समजते. कोल्हापूर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार दोन विभाग पडतात.
प्राकृतिक विभाग
( १ ) पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश :
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वत व त्या चे फाटे आहेत. या विभागात शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा व चंदन गड या तालुक्यांतील डोंगराळ भाग येतो.
( २ ) नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश :
कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या खोऱ्याच्या व पूर्वेकडील भाग सखल मैदानाचा आहे. हा भाग नद्यांच्या काठ चा असल्याने सुपीक आहे.
जिल्ह्यात
पन्हाळा, विशाळगड, रांगणा इत्यादी किल्ले आहेत. तसेच पावनखिंड किंवा घोडखिंड आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
- कोल्हापूर – महालक्ष्मी मंदीर, रंकाळा तलाव, नवीन राजवाडा व शालिनी पॅलेस ही प्रक्षणीय स्थळे आहेत. ‘कुस्तीगिरांची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. ‘खासबाग’ हे कुस्तीचे प्रसिद्ध मैदान येथेच आहे. अलीकडे या शहरास कलानगरी म्हणून ओळखले जाते.
- पन्हाळा – पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे पन्हाळगड हा किल्ला आहे.
- राधानगर – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे अभयारण्य आहे. ते राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखले जाते.
- बाहुबली – हे ठिकाण जैन धर्मियांचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
- आजरा – (तालुका स्थळ) रावळनाथ व रामलिंग मंदिरे व एक पडका किल्ला तसेच बॉक्साईटचे साठे यासाठी हा भाग प्रसिद्ध. रामलिंग मंदीर त्याच्या निसर्गरम्यते मुळे लोकांचे आवडते ठिकाण.
- आळते – (ता. हातकणगले) लाल रंग म्हणजे आळता तयार करण्यासंबंधी हे गांव मध्ययुगात प्रसिद्ध होते. आजही काही प्रमाणात आळत्याची निर्मिती येथे होते. गुहेतील शिवमंदिर प्रसिद्ध. ही मुळची जैन धर्मीय गुहा.
- इचलकरंजी – (हातकणगले ता.) हातमागावरील साडया व इतर कपड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध म्हणून या गावास मँचेस्टर म्हणत. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक याच गावातले. शास्त्रीय संगीत क्षेत्रात या गावाने मोठे योगदान दिले आहेत.
- कणेरी – (करवीर ता.) लिंगायतांचे पीठ, कडसिद्धे श्वराचा मठ यासाठी हे गाव प्रसिद्ध इ.स. 12 व्या शंतकापासून या मठाला इतिहास आहे.पन्हाळ्याच्या पाटील कुटुंबाकडे असलेल्या ताम्रपटात या मठाचा उल्लेख आढळतो.
- बालिंगे – (कात्यायनी पार्क) (करवीरा ता.) कात्यायनी मंदीर व निसर्ग यासाठी प्रसिद्ध. कात्यायनीचे एवढे मोठे क्षेत्र महाराष्ट्रात दुसरे नाही.
- ज्योतिबा – (ता. पन्हाळा) 1730 मध्ये ज्योतिबाचे मंदीर राणाजीराव शिंदेंनी बांधले. येथे मोठी यात्रा भरते.
- वडगाव – हे गाव हातकणगले या तालुक्यात असून येथे धनाजी घोरपडेंची समाधी आहे.
- नरसिंहांची वाडी – यास नरसोबाची वाडी म्हणून ओळखतात. दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध.
- हुपरी – हे गाव हातकणगले या तालुक्यात असून हे गाव चांदी व चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे.
No comments:
Post a Comment