वर्धा

 १ . वर्धा जिल्हा   - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात वर्धा जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पूर्व  भागात आहे.

सीमा : वर्धा जिल्ह्याच्या उत्तर व पूर्वेस नागपूर जिल्हा आहे. आग्नेयेस चंद्रपूर जिल्हा, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा आणि पश्चिमेस अमरावती जिल्हा आहे.



महाराष्ट्र राज्य - वर्धा जिल्हा 


  • जिल्हाचे मुख्य ठिकाण – वर्धा
  • क्षेत्रफळ – 6,309 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या –  12,96,157 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके ( 8 ) -  आर्वी, वर्धा , हिंगणघाट, सेलू, देवळी , समुद्रपूर , आष्टी, कारंजा.

    •  वर्धा जिल्हा - तालुके 

    वर्धा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

    • वर्धा – जवळच असलेले  सेवाग्राम येथे महात्मा गांधीजींचा व पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेला ‘परमधाम आश्रम प्रासिद्ध आहे. राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय येथे आहे. वर्धा येथील अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ ही संस्था प्रसिध्द आहे.

    • हिंगण घाट – येथील जैन मंदिर व मल्हारी – मार्तंड मंदिर प्रसिध्द आहे.

    • आर्वी – येथील काचेचे जैन मंदिर प्रसिध्द आहे. आर्वीला संतांची आर्वी म्हणून ओळखतात.

    • आष्टी – 1942 च्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात अनेक सत्याग्रही मारल्या गेले.

    • पवनार – विनोबा भावेंनी स्थापन केलेला परमधाम आश्रम आहे.

    • सेवाग्राम – सेवाग्राम येथे ‘बापू-कुटी’ प्रसिध्द आहे.

    • पुलगाव – लष्करी सामग्रीचे कोठार यासाठी प्रसिध्द आहे.

    • केळझर – स्फोटक द्रवाचा कारखाना.

    • ढगा – हे गाव कारंजा तालुक्यात येत असून येथे शिवलिंग असलेली प्राचीन मंदिर आहे.

    No comments:

    Post a Comment