१ . हिंगोली जिल्हा - स्थान व सीमा
स्थान : महाराष्ट्र राज्याच्या नकाशात हिंगोली जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात भागात आहे.
सीमा : हिंगोली जिल्हाच्या उत्तरेस बुलढाणा व वाशिम हे दोन जिल्हे, पूर्वेस नांदेड व यवतमाळ हे दोन जिल्हे, दक्षिणेस नांदेड व परभणी हे दोन जिल्हे, पश्चिमेस परभणी व जालना हे दोन जिल्हे आहेत.
|
महाराष्ट्र राज्य - हिंगोली जिल्हा |
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – हिंगोली
- क्षेत्रफळ – 4,524 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 11,78,973 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 5 – हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी.
हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
- हिंगोली – हिंगोली येथे जनावरचा मोठा दवाखाना आहे. येथील दसरा महोत्सव प्रसिध्द आहे.
- वसमत – येथे प्लायवूडचा कारखाना आहे. येथे हातमागावरील व यंत्रमागावरील कापडाची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते.
- औंढा नागनाथ – हे स्थान देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाते. येथे संत नामदेव व त्यांचे गुरु विठोबा खेचर यांच्या समाध्या आहेत.
- येलदरी – या ठिकाणी वीजनिर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे.
- नरसी – येथील नृसिंहाचे मंदिर प्रसिध्द आहे. हे संत नामदेवाचे जन्मस्थान मानले जाते.
- शिरडशहापूर – येथील जैन मंदिर प्रसिध्द आहे.
- भाटेगाव – कळमनुरी तालुक्यात मत्स्यबीज केंद्र आहे.
No comments:
Post a Comment