गोंदिया

  १ . गोंदिया जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात गोंदिया जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पूर्व  भागात आहे.

सीमा : गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश असून पूर्वेस छत्तीसगढ राज्य आहे. दक्षिणेस गडचिरोली जिल्हा आणि पश्चिमेस भंडारा जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य
- गोंदिया जिल्हा 

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – गोंदिया

क्षेत्रफळ – 5,431 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 13,22,331 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके – () – गोंदिया , तिरोडा , गोरेगाव , आमगाव , देवरी, सालेकसा, अर्जुनी (मोरेगाव), सडक -अर्जुनी


गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • गोंदिया – येथील भाताच्या गिरण्या व लाकूडकटाई प्रसिद्ध आहे.

  • तिरोडा – तांदळाची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे.

  • आमगाव – प्रसिध्द संस्कृत नाटककार भवभूती यांचे स्मारक येथे आहे.

  • नवेगाव बांध – येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन केंद्र म्हणून प्रसिध्द आहे.

  • प्रतापगड – येथील प्राचीन किल्ला व शिवमंदिर प्रसिध्द आहे.

  • नागझीरा – हे स्थळ अभयारण्य म्हणून प्रसिध्द आहे.

  • सडक अर्जुनी – बांबुच्या कलात्मक आणि विविधोपयोगी वस्तू निर्मितीचे केंद्र.
             

No comments:

Post a Comment