सांगली

 १ .सांगली जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात सांगली जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहे.

सीमा :  सांगली जिल्हाच्या उत्ततेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा, उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा, पूर्वेस कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस व नैऋत्येस कोल्हापूर जिल्हा असून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा.


 
महाराष्ट्र राज्य - सांगली जिल्हा

  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – सांगली
  • क्षेत्रफळ – 8,572 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 28,20,575 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – ( 10 ) – खानापूर, कवठे महाकाळ, वाळवे, तासगाव, जत, शिराळे, आतपाडी, पलूस, मिरज, कडेगाव.
    सांगली जिल्हा - तालुके 

सांगली  जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –


  • सांगली – शहराच्या मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला असून येथील गणेशमंदिर प्रसिद्ध आहे.

  • मिरज – येथील भुईकोट किल्ला व मिरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे.

  • औंदुबर – या गावात दत्तात्रय मंदिर असून हे मंदीर नरसिंह सरस्वती यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. ब्राम्हण कुटुंबात 1304 मध्ये जन्माला आलेले हे संत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर भवनेश्वरीचे मंदीर आहे.

  • बहादूरवाडी – या गावात माधवराव पेशव्यांनी 1761 च्या सुमारास किल्ला बांधला.

  • बेडग – ता. मिरजपासून 11 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.

  • भोपाळगड – ता. खानपूरच्या दक्षिण पूर्वेस एक किल्ला असून तो शिवाजीच्या ताब्यात होता.

  • भोसे – येथे दांडोबा महादेव गुफा प्रसिद्ध असून या गुहेत यादव राजा सिंघण यांचा शिलालेख आहे.

  • देवराष्ट्र – हे गाव खानापूर तालुक्यातील असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी होय. या गावात अनेक प्राचीन लेण्या आहे.

  • कासबे दिग्रज – मिरज तालुक्यातील हे गाव पाच हिंदू मंदिरे व दोन जैन बस्तीसाठी प्रसिद्ध आहे.

  • कुंडल – तासगाव तालुक्यातील या गावात हिंदूच्या लेण्या आहे.

  • शिराळा – या तालुक्याच्या गावात देश-विदेशातील लोक नागपंचमीसाठी येथे येतात.

  • मच्छिंद्रगड – कर्हाड तालुक्यातील उत्तरेस शिवाजीने हा किल्ला बांधला.



No comments:

Post a Comment