१ . बुलढाणा जिल्हा - स्थान व सीमा
स्थान : महाराष्ट्र राज्याच्या नकाशात बुलढाणा जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात भागात आहे.
सीमा : बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस परभणी व जालना हे दोन जिल्हे असून पूर्वेस अकोला जिल्हा आहे. पश्चिमेस औरंगाबाद व जळगाव हे दोन जिल्हे आहेत.
|
महाराष्ट्र राज्य - बुलढाणा जिल्हा |
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – बुलढाणा
- क्षेत्रफळ – 9,661 चौ. कि.मी.
- लोकसंख्या – 25,88,039 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – ( १३ )– जळगांव जामोद, मलकापुर, बुलढाणा, खामगांव, नांदुरा, चिखली, मेहकर, शेगाव, देऊळगांवराजा, सिंदखेडराजा, संग्रामपुर, लोणार, मोताळा.
बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
- बुलढाणा – हे शहर अजिंठ्याच्या डोंगर रांगात वसले असून थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.
- खामगाव – येथे एक कुष्ठरोग निवारण केंद्र आहे. जवळच गारडगावाला प्रेक्षणीय बुद्ध विहार आहे.
- मलकापुर – येथील गौरीशंकर मंदिर विहार आहे.
- देऊळगाव राजा – देऊळगाव -राजा येथील बालाजी मंदीर प्रसिद्ध आहे.
- शेगांव – येथे गजानन महाराजांची समाधी आहे.
- सिंदखेड-राजा – छत्रपती शिवाजी महाराजाच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान
- जामोद – जामोदचे प्राचीन जैन मंदीर प्रसिद्ध आहे.
- लोणार – उल्कापातामुळे तयार झालेला तलाव व त्या शेजारी यादवकालीन मंदीर प्रसिद्ध आहे. 18 व्या शतकात लोणार महात्म्यही लिहिले गेले त्यात लवणासुर या राक्षसाची कथा या महात्म्यात येते.
No comments:
Post a Comment