१ . नाशिक जिल्हा - स्थान व सीमा
स्थान : महाराष्ट्र राज्याच्या नकाशात नाशिक जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात वायव्य भागात आहे.
सीमा : उत्तरेस घुळे जिल्हा, पूर्वेस जळगांव जिल्हा, पश्चिमेस ठाणे जिल्हा, दक्षिणेस अहमदनगर जिल्हा असून आग्नेयेस औरंगाबाद जिल्हा, ईशान्येस धुळे जिल्हा, वायव्येस गुजरात राज्यातील डांग व सूरत हे दोन जिल्हे.
|
महाराष्ट्र राज्य - नाशिक जिल्हा
|
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – नाशिक
- क्षेत्रफळ – 15,530 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 61,09,052 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – ( १५ ) – नसहिक, बागलाण (सटाणा), मालेगांव, सुरगणा, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड, नांदगांव, निफाड, येवले, इगतपुरी, सिन्नर, त्रंबकेश्वर, देवळा.
|
|
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
- नाशिक – येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930 ला केला. नाशिक (ओझर) येथे मिग विमानाचा कारखाना व सिक्युरिटी प्रेस आहे.
महाराष्ट्र राज्य पोलिस अकॅडमी ही संस्था नाशिक येथे आहे.
- त्र्यंबकेश्वर – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिक जिल्ह्यातच आहे.
- मालेगाव – पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.
- येवले – तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. डॉ. आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता.
- सापुतरा – निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे.
- भगूर – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान.
- नांदूर – मध्यमेश्वर – भरतपुर नावाचे अभयारण्य येथेच आहे.
- भोजापूर – खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर.
- देवळाली – सैन्याचे प्रशिक्षण केंद्र, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध.
- गंगापूर – गोवर्धन म्हणून सातवाहन शिलालेखात उल्लेखलेले हे ठिकाण.
- सप्तश्रुंगी – साडेतीन पीठापैकी एक पीठ. मोठ्या संख्येने येथे लोक दर्शना येतात.
- सिन्नर – यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी व 9 व्या शतकातील व 12 व्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध.
- दिंडोरी – छत्रपती शिवाजी महाराज व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध.
No comments:
Post a Comment