अहमदनगर

   १ . अहमदनगर जिल्हा  - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात अहमदनगर जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात भागात आहे.

सीमा : अहमदनगर  जिल्हाच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हा, पूर्वेस बीड व उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस पुणे व ठाणे जिल्हा, दक्षिणेस सोलापूर जिल्हा आहे.



महाराष्ट्र राज्य - अहमदनगर जिल्हा


  •         जिल्ह्याचे मुख्य ठिकाण  अहमदनगर
  •         क्षेत्रफळ  17,058 चौ.कि.मी.
  •        लोकसंख्या  45,43,083 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  •        तालुके  ( १४ ) – कोपरगाव, आकोले, संगमनेर,श्रीगोंदे, श्रीरामपूर, राहुरी, अहमदनगर, शेवगाव, पारनेर, नेवासे, पाथर्डी, कर्जत, जामखेड (महाल), राहता.


अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • अहमदनगर – शहरातील भुईकोट किल्ला व चांदबिबीचा महाल ही ऐतिहासीक स्थळे प्रसिद्ध आहेत. येथे लष्कराचा वाहन संशोधन व विकास विभाग आहे. सैन्याचे रणगाडा प्रशिक्षण केंद्र येथे आहे.

  • अकोले – येथील अगस्तिऋषींचा आश्रम प्रसिद्ध आहे.

  • प्रवरानगर – देशातील पहिला सहकारी साखर कारखाना येथेच उभा राहिला.

  • नेवासे – येथेच संत ज्ञांनेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली.

  • राहुरी – महात्मा फुले कृषी विधापीठ याच ठिकाणी आहे.

  • शनि-शिंगणापुर – शनि-शिंगणापुर हे नेवासे तालुक्यात आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. या गावातील कोणत्याही घराला दरवाजे-कडया नाहीत हे आगळे-वगळे वैशिष्ट्य होय.

  • राळेगण सिद्धी – थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या परिश्रमातून या खेड्याचा कायापलट झाला. संपूर्ण व्यसनमुक्त असलेले हे गाव सामाजिक वनीकरण, कुटुंब कल्याण व शिक्षणक्षेत्रात आघाडीवर आहे.

  • शिर्डी – साईभक्ताचे श्रद्धास्थान

  • सिद्धटेक – येथील गणपतीस श्रीसिद्धीविनायक म्हणून संबोधले जाते.

  • भंडारदारा – अकोले तालुक्यात प्रवारा नदीवर ‘भंडारदरा’ हे धरण बांधण्यात आले आहे. निसर्गरम्य परिसरामुळे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणस्थळ बनले आहे.

No comments:

Post a Comment