रायगड

१ . रायगड जिल्हा - स्थान व सीमा 

स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात रायगड जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पश्चिम भागात आहे.

सीमा : रायगड जिल्हाच्या उत्तरेस ठाणे  जिल्हा आहे. पूर्वेस पूर्वेस पुणे जिल्हा आहे. जिल्हयाच्या या भागात साह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत तर दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा व पश्चिमेस अरबी समुद्र आहे.


 महाराष्ट्र राज्य - रायगड जिल्हा  


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – रायगड
क्षेत्रफळ –  चौ.कि.मी.
लोकसंख्या –  (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – ( 15 )– अलिबाग ( जिल्हा मुख्यालय ), पनवेल, कर्जत, उरण, खालापूर, 
पेण, पाली ( सुधागड ), मुरुड, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसाळा, महाड, पोलादपूर, तळा

लोकसंख्या – (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – ( 15 )– अलिबाग 
समुद्र किनारा - 122 km


२. भूरूपे 

        रायगड जिल्ह्यात विविध भूरूपे आहेत. भूरूपांच्या उंचसखलपणामुळे प्राकृतिक रचना समजते. रायगड जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार तीन विभाग पडतात.

( १ ) किनाऱ्यालगतचा किंवा खालटी  प्रदेश.
( २ ) मध्य भागातील सखल व सुपीक मैदानी प्रदेश.
( ३ ) सह्याद्री पर्वताचा प्रदेश.

( १ ) किनाऱ्यालगतचा किंवा खालटी  प्रदेश :
                                                                        जिह्याच्या पश्चिमेकडील भाग किनाऱ्याला  आहे. या भागातील बरीच जमीन कसदार आहे. समुद्राला लागून वळूमिश्रित हलकी जमीन  आहे. उरण, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन व तळे या तालुक्यांचा बराचसा भाग या किनारी प्रदेशात येतो.

( २ ) मध्य भागातील सखल व सुपीक मैदानी प्रदेश :
                                                                                    किनारपट्टी व पूर्वेकडील भाग यांमधील मैदानी भाग सखल व सुपीक आहे. पनवेल, पेन, रोहे, तळे, माणगाव, म्हसळे व महाड या तालुक्यांचा काही भाग यात येतो.

( ३ ) सह्याद्री पर्वताचा प्रदेश : 
                                               जिह्याच्या पूर्व  भागात सह्याद्रीच्या रांगा आहेत. कर्जत, खालापूर, सुधागड, माणगाव, महाड, पोलादपूर या तालुक्यांचा पूर्व भाग यामध्ये येतो.

बेटे : 
              रायगड जिल्ह्यात घारापुरी ( एलिफंटा  ), खांदेरी,  उंदेरी,कासा, कुलाबा व जंजिरा आहेत




३. नद्या


          रायगड जिल्ह्यातील बहुतेक नद्या पूर्वेकडे सह्याद्री पर्वतात उगम पावतात व पश्चिमेकडे  अरबी समुद्रला मिळतात. रायगड जिल्ह्यात उल्हास, पाताळगंगा, भोगावती, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री इत्यादी नद्या आहेत. 
         नद्यांच्या मुखाशी समुद्राचे खारे पाणी शिरून खाड्या तयार झाल्या आहेर. पनवेल, धरमतर, रोहे, राजपुरी, बाणकोट इद्यादी खाड्या या भागात आहेत.  



४. हवामान

              रायगड जिल्हा समुद्राला लागून आहे. या जिहाचे हवामान उष्ण व दमट आहे. या जिल्ह्यात खूप पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. जिल्ह्यात सह्याद्री पर्वत भागात सर्वात जास्त पाऊस पडतो. 
            माथेरान हे या जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे 


No comments:

Post a Comment