अमरावती

१ . अमरावती जिल्हा  - स्थान व सीमा 

स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात अमरावती जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पूर्व  भागात आहे.

सीमा : अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा असून पूर्वेस नागपूर व वर्धा हे दोन जिल्हे आहेत. पश्चिम व नैऋत्येस अकोला जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - 
अमरावती जिल्हा


  • जिल्ह्याचे नाव - अमरावती ( अंबा नगरी )
  • निर्मिती - 
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण  अमरावती
  • क्षेत्रफळ  12,210 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या  28,87,826 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके  14 – अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अमरावती, चांदुरबाजार, भातकुली, अंजनगांव (सुर्जी), नांदगांव (खं.), चिखलदरा, धारणी, वरुड, तिवसा, चांदूर रेल्वे, धामनगांव रेल्वे.

  • नगरपरिषद -  10
  • नगरपंचायत  - 03
  • महानगर पालिका - 01

अमरावती जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • अमरावती – येथील संत गाडगे महाराजांनी समाधी व अंबादेवी मंदीर प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय येथे आहे.

  • चिखलदरा – थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाते.

  • परतवाडा  – इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.

  • रिद्धपूर – येथे गोविंद्प्रभुंची समाधी आहे. महानुभावांची काशी म्हणून प्रसिद्ध.

  • शेडगाव – संत गाडगे महाराजांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.

  • मोझरी – संत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेला गुरुकुंज आश्रम येथे आहे. महाराजांची समाधी येथेच आहे.

  • ऋणमोचन – येथील मुदगलेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे.

  • बडनेरा – विड्याच्या पानासाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.

  • कौंडिण्यपुर – विदर्भाची पौराणिक राजधानी कुंडीनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडिण्यपुर म्हणून ओळखले जाते. प्राचीन अवशेषांकरिता विशेष प्रसिद्ध आहे.

  • सालबर्डी – हे गाव मोर्शी तालुक्यात असून मारू नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाजवळच 2 बौद्ध व 5 हिंदू लेणी आहेत. शिवाय नुकत्याच काळात पाशुपत पंथाच्या 2 लेण्यांचा शोध लागलाय. तसेच लंकेश्वर व पंचवतार मंदिरे, डोंगरावरील शिव मंदीर प्रसिद्ध आहे.

No comments:

Post a Comment