पुणे

१ . पुणे जिल्हा - स्थान व सीमा 

स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात पुणे जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पश्चिम भागात आहे.

सीमा : पुणे जिल्हाच्या  उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य -  पुणे जिल्हा 

  • जिल्हयाचे मुख्य ठिकाण – पुणे      
  • क्षेत्रफळ – 15,643 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 94,26,959 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 14 – जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती.
    पुणे जिल्हा - तालुके 




पुणे जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • पुणे – मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. तसेच निगडी येथे ‘अप्पूघर‘ हे करमणुकीचे केंद्र आहे.

  • पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील ‘अप्पूघर’ हे एक करमणुकीचे केंद्र आहे.

  • जुन्नर – जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता.

  • आळंदी – हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे.

  • देहू – हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.

  • चाकण – येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे.

  • लोणावळा – हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत.

  • जेजूरी – महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे.

  • आर्वी – आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे ‘विक्रम’ हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.

  • राजगुरूनगर – हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे.

  • भीमाशंकर – येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे.

  • उरुळी कांचन – येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे.

  • दौंड – दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते.

  • वालचंदनगर – येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे.

  • सासवड – हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे. सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.

  • भोर – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत.

  • वेल्हे – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत.

  • वढू – येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

  • पौंड – हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे.

No comments:

Post a Comment