गडचिरोली

 १ . गडचिरोली जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात गडचिरोली जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात पूर्व भागात आहे.

सीमा : गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेस भंडारा जिल्हा व पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे. दक्षिणेस आंध्रप्रदेश आणि पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - 
गडचिरोली जिल्हा

  •  जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – गडचिरोली
  • क्षेत्रफळ – 14,412 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 10,71,795 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – ( १२ )– कुरखेडा, अहेरी, धानोरा, सिरोंचा, कोरची, आरमोरी, चामोर्शी, एटापल्ली, गडचिरोली, भामरागड, मुलचेरा, देसाईगंज.

गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • हेमलकसा- अपंग व कुष्टरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनाकरिता बाबा आमटे व त्यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे यांनी एक प्रकल्प सुरु केला आहे.

  • सिरोंचा – येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ पर्वणी यात्रा भरते.

  • आरमोरी – या गावात त्रिदल पध्दतीचे शैव मंदिर आहे. हे मंदिर गोंड राजा हरीश्र्चंद्राने बांधले जो वैरागडचा किल्लेदार होता. नंतर हा भाग रघुजी भोसलेच्या ताब्यात गेला.

  • शोधग्राम – डॉ. अभय बंग व त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांचे येथे आरोग्य केंद्र आहे.

  • वैरागड – खोब्रागडी व सातनाला नद्यांच्या संगमावर आरमोरी तालुक्यात हा प्रसिध्द किल्ला आहे. विराट राजाची ही राजधानी . हा किल्ला राजा बाबाजी बल्लार शहा याने 1572 मध्ये बांधला असे मानतात.


No comments:

Post a Comment