नंदुबार

  १ .नंदुबार जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात नंदुबार जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात वायव्य भागात आहे.

सीमा : नंदुबार जिल्हाच्या उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश, पूर्वेस धुळे जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस गुजरात राज्य, दक्षिणेस धुळे जिल्हा आहे.

महाराष्ट्र राज्य - 
नंदुबार जिल्हा

  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – नंदुरबार
  • क्षेत्रफळ – 5,055 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 16,46,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – ( 6 ) – नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदे, नवापुर, शहादे, धडगांव (अक्राणी).

     नंदुबार जिल्हा - तालुके 



नंदुबार जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • नंदुरबार – येथे 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात छातीवर गोळ्या झेलणार्‍या बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक आहे.

  • प्रकाशे – येथील केदारेश्वर व संगमेश्वर मंदिरे प्रसिद्ध आहेत. यालाच दक्षिण काशी म्हणतात.

  • धडगाव – हे अक्राणी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे.

  • तोरणमाळ – प्राचीन मांडू घराण्याची राजधानी. निसर्गरम्य ठिकाण.

No comments:

Post a Comment