उस्मानाबाद

  १ . उस्मानाबाद जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात उस्मानाबाद जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात आग्नेय भागात आहे.


महाराष्ट्र राज्य - 
उस्मानाबाद जिल्हा

सीमा : उस्मानाबाद जिल्हाच्या उत्तरेस बीड जिल्हा, पूर्वेस लातूर जिल्हा, दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस सोलापूर जिल्हा, वायव्येस अहमदनगर जिल्हा आहे.


  • जिल्हाचे मुख्य ठिकाण – उस्मानाबाद
  • क्षेत्रफळ – 7,569 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 16,60,311 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके ( 8 ) -  परांडा, भूम, उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, उमरगा, वाशी, लोहारा.

    • उस्मानाबाद जिल्हा - तालुके 
    उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –


    • उस्मानाबाद – उस्मानाबाद येथील हजरत ख्याजा शम्सुद्दीन गाझीचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

    • तुळजापूर – महाराष्ट्रचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी किंवा भवानी मातेच्या मंदिरामुळे राज्यात प्रसिद्ध.

    • नळदुर्ग – हे ठिकाण भुईकोट किल्यामुळे प्रसिद्ध आहे. ‘पाणी महल’ हे नळदुर्गाच्या किल्यातील प्रमुख आकर्षण आहे.

    • तेरणा – तेरणा हे ऐतिहासिक गाव बौद्धकालीन स्तूप व संत गोरा कुंभाराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

    • परांडा – एकेकाळची निजामशाहीची राजधानी. ऐतिहासिक किल्ला व संतकवी हंसराज स्वामीचा मठ.

    • डोणगाव – रामदास स्वामीचे पट्टाशिष्य कल्याणस्वामी यांचा मठ व ख्वाजा बद्रुद्दीन साहेबांचा दर्गा यासाठी प्रसिद्ध.

    No comments:

    Post a Comment