बीड

 १ . बीड जिल्हा - स्थान व सीमा 


स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात बीड जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात भागात आहे.

सीमा : बीड जिल्हाच्या उत्तरेस जालना व औरंगाबाद हे दोन जिल्हे, पूर्वेस लातूर जिल्हा, दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस अहमदनगर जिल्हा, ईशान्येस परभणी जिल्हा असून आग्नेयेस कर्नाटक राज्यातील बीदर जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - बीड जिल्हा

  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – बीड
  • क्षेत्रफळ – 10,693 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 25,85,962 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 11 – गेवराई, आष्टी, माजलगांव, पाटोडा, केज, अंबाजोगाई, धारूर, परळी, बीड, शिरूळ-कासार, वडवणी.

  • बीड जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

  • बीड – शहरात कंकालेश्वराचे जलमंदिर आहे. शहराजवळ ‘खजाना’ ही प्रसिद्ध विहीर असून तिचे पाणी कधीच आटत नाही. येथील औष्णिक विधुत केंद्र राष्ट्रीय पातळीवरही महत्वाचे गणले जाते.

  • मांजरशुभा – जवळच ‘कपिलधार’ नावाचा धबधबा आहे.

  • राक्षसभुवन – 10 ऑगस्ट 1763 रोजीची पेशवा व निजाम यांच्यातील निर्णायक युद्धाची जागा येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे.

  • आष्टी – येथील हजारतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

  • आंबेजोगाई- जोगाई व खोलेश्वर यांची प्राचीन मंदिरे, आधकवी मुकुंदराज व संतकवी दासोपंत यांच्या समाधीसाठी प्रसिद्ध.

  • परळी – येथील बैजनाथाचे मंदिर प्रसिद्ध असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.

No comments:

Post a Comment