१ . औरंगाबाद जिल्हा - स्थान व सीमा
स्थान : महाराष्ट्र राज्याच्या नकाशात औरंगाबाद जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्राच्या सर्वसाधारणपणे मध्यभागात आहे.
सीमा : औरंगाबाद जिल्हाच्या उत्तरेस जळगाव जिल्हा, पूर्वेस जालना जिल्हा, दक्षिणेस गोदावरी नदीच्या पलीकडे बीड, पश्चिमेस नाशिक जिल्हा आहे.
|
महाराष्ट्र राज्य -औरंगाबाद जिल्हा |
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – औरंगाबाद
- क्षेत्रफळ – 10,107 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 36,95,928 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – ( 9 )– कन्नड, सिल्लोड, सोयगांव, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद, पैठण, फुलंब्री.
औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
- औरंगाबाद – येथील ‘बीबी का मकबरा’ दख्खनचा ताजमहाल म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथील पाणचक्की पाहण्याजोगी आहे. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विधापीठाचे मुख्य कार्यालय आहे.
- दौलताबाद – ‘देवगिरी’ हा यादवकालीन किल्ला आहे. देवगिरी ही यादवाजी राजधानी होती. पुढे दिल्लीचा सुलतान महंमद तुगलकाने देवगिरीचे नाव ‘दौलताबाद’ ठेवले.
- खुलताबाद – येथे मोगल सम्राट औरंगजेबाची कबर आहे.
- वेरूळ – खुलताबाद तालुक्यात वेरूळची लेणी किंवा गुंफा मंदिरे आहेत. तेथील कैलास लेणी जगप्रसिद्ध आहेत. श्री घृष्णेश्वर हे बारावे व शेवटचे ज्योतिर्लिंग येथे आहे.
- अजिंठा – सिल्लोड तालुक्यात अजिंठ्याचा जगप्रसिद्ध लेणीसमूह आहे.
- पैठण – येथे एकनाथांची समाधी आहे. जायकवाडी प्रकल्पातील ‘नाथसागर’ जलाशय येथेच आहे.
- आपेगांव – संत ज्ञानेश्वराचे जन्मस्थळ.
- पितळ्खोरा – बौद्धकालीन लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन लेणीगणली जाते.
No comments:
Post a Comment