सातारा

१ . सातारा जिल्हा  - स्थान व सीमा 

स्थान :  महाराष्ट्र राज्याच्या नकाशात सातारा जिल्हा दाखवला आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात दक्षिण  भागात आहे.


सीमा : सातारा जिल्हाच्या  उत्तरेस पुणे जिल्हा, पूर्वेस सोलापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा असून वायव्येस रायगड जिल्हा आहे.


महाराष्ट्र राज्य - 
सातारा जिल्हा


  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – सातारा
  • क्षेत्रफळ – 10,480 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 30,03,922 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – ( 11 )– खंडाळा, फलटण, वाई, माण, जावळी, लाख महाबळेश्वर, कोरेगांव, खटाव, सातारा, पाटण, कराड.
    सातारा जिल्हा - तालुके 

सातारा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –


  • सातारा – सातारा शहरामध्ये शिलाहार वंशातील राजा दूसरा भोज याने 1990 मध्ये ‘अजिक्यतारा’ हा किल्ला बांधला आहे. येथील छत्रपती वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. जवळच सज्जनगड या किल्यावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे.

  • महाबळेश्वर, पाचगणी – हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर येथे महाबळेश्वराचे मंदीर.

  • वाई – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषनिर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय येथे आहे.

  • पाटण – येथे ‘शिवाजीसागर’ हा जलाशय आहे.

  • कर्हाड – एथे कृष्णामाईचे मंदीर व यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे.

  • औंध – औंधचे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे.

  • प्रतापगड – महाबळेश्वर तालुक्यात शिवरायांनी 1656 मध्ये या गडाची उभारणी केली. याच कडावर अफझलखानाचा वध झाला.

  • चाफळ – छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी याची भेट येथे झाली.

  • सज्जनगड – स्वामी समर्थ रामदास यांचे कार्यस्थान. यांच्या वास्तव्याने गडास ‘सज्जनगड’ असे नाव देण्यात आले आहे.

  • म्हसवड – येथे 12 व्या शतकातील सिद्धनाथाचे मंदीर, कल्याणी चालुक्य राजा जगदेकमल्ला याचा शिलालेख मंदिरात आहे.

  • माहुली – ता. सातारा पासून 5 कि.मी. अंतरावर पूर्वेस कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांना संगम.

  • मसूर – ता. कराड येथे समर्थ रामदास स्वामींनी बांधलेले मारूतीचे मंदीर.

  • निगडी – समर्थ रामदासांचे समकालीन संत रघुनाथ (रंगनाथ) यांचे गाव.

No comments:

Post a Comment